
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीवरून राजस्थानात मोठ्या हालचाली सुरू आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात अशोक गहलोत राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? असे प्रश्न उपस्थित उपस्थित होताना दिसत आहे. या सुरू असलेल्या चर्चेवर गहलोत यांनी उत्तर देत चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. (cm Ashok Gehlot on Congress president election or his cm post )
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे की, जर राहुल गांधी या निवडणुकीत उतरले नाहीत तर ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र, ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर मुख्यमंत्रीपद सोडणार का, असा प्रश्न त्यांना उपस्थित करण्यात आला.
या प्रश्नावर उत्तर देताना अशोक गेहलोत यांनी ही खुली निवडणूक आहे, कोणीही लढू शकत, हा नियम नामनिर्देशित पदांसाठी आहे. असे उत्तर दिले आहे.
''हायकमांड जेव्हा उमेदवारी देते तेव्हा दोन पदे येतात. ही निवडणूक आहे. ही खुली निवडणूक आहे. त्यात कोणीही उभे राहू शकते. यामध्ये कोणताही आमदार, खासदार, मंत्री निवडणूक लढवू शकतो. कोणत्याही राज्यमंत्र्याने निवडणूक लढवायची असेल, असे सांगितले तर तो लढू शकतो. ते मंत्रीही राहू शकतात.'' असे स्पष्टीकरण अशोक गेहलोत यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री पदावरही गेहलोत यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री पदावर राहण्याचा किंवा न राहण्याचा मुद्दा नाही. वेळचं सांगेल की मी कोणत्या पदावर असेन. पण मी मला तिथं राहण आवडेल जिथे माझा पक्ष फायद्याचा ठरेल. मात्र, मी मागे हटणार नाही. असे सांगत गेहलोत म्हणाले, आज देशाची जी स्थिती आहे, त्यासाठी काँग्रेस मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे.
काँग्रेसला मजबूत करण्यासाठी जिथे जिथे माझी गरज असेल तिथे मी मागे हटणार नाही. ते म्हणाले, राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे, असा प्रस्ताव मी ४-५ दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये ठेवला होता. त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून दौरे केल्यास पक्षाची वेगळी प्रतिमा निर्माण होईल. त्यांचे मन वळवण्याचा मी आणखी एकदा प्रयत्न करेन. असं देखील गेहलोत यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.