मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्सिस बँकेवर मेहरबान का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत मोठ्या पदावर नोकरीला आहेत. यामुळे अॅक्सिस बँकेला झुकते माप दिले गेले काय, असाही सूर उमटत आहे. मोहनीष जबलपुरे यांनी मागील आठवड्यात फडणवीस व राज्य सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बँकमध्ये ट्रान्सफर केल्याचा आरोप फडणवीसांवर करण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व राज्यसरकारवर कारवाई व्हावी याबाबत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत मोठ्या पदावर नोकरीला आहेत. यामुळे अॅक्सिस बँकेला झुकते माप दिले गेले काय, असाही सूर उमटत आहे. मोहनीष जबलपुरे यांनी मागील आठवड्यात फडणवीस व राज्य सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

यामध्ये त्यांनी राज्य सरकारने 11 मे 2017 मध्ये एक परिपत्रक काढून राज्यातील पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बॅंकेवर मेहरबान झाले. या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना फटका बसला असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. या महिन्याच्या अखेरीसपर्यंत या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devedra Fadnavis why gives preference to Axis Bank for government employees salary account