Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री ठोकणार सभांचे अर्धशतक; उद्धव यांच्या रोज 4 सभा

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री ठोकणार सभांचे अर्धशतक; उद्धव यांच्या रोज 4 सभा

मुंबई : भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 20 सभा महाराष्ट्रात होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा राज्यातला "ब्रॅण्ड' झालेल्या फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढते आहे. नागपुरातील मतदारसंघातील संपर्क तसेच निवडणुकीसाठीचा मोजका कालावधी लक्षात घेत जास्तीत जास्त सभा कशा घेता येतील, याची आखणी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून केली जात आहे. 10 ते 12 दिवसांच्या कालावधीत 45 सभा होतील, अशी प्रारंभिक आखणी होती; मात्र आता ही संख्या 50 पर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीत सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

उद्धव ठाकरेंच्या दररोज चार सभा 
दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा सुरू करणार आहेत. 9 ऑक्‍टोबरला संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर आणि नगर येथे त्यांच्या सभा होतील. 10 ऑक्‍टोबरला घनसावंगी, वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद येथे, 11 तारखेला अमरावती ही विदर्भातील सभा आटोपून ते जुन्नर, खेड आळंदी आणि पिंपरी येथे ते सभांसाठी उपस्थित राहतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com