मुंबई - गडचिरोलीमधील न्यू स्टील सिटी, अमरावतीचे टेक्स्टाईल पार्क, देशाची ई-व्हेईकलची राजधानी छत्रपती संभाजीनगर, डिफेन्स-एरोस्पेस उद्योगांचे केंद्र नाशिक, पुणे-अहिल्यानगरचा डिफेन्स कॉरिडॉर, देशाची डेटा सेंटर राजधानी असलेली नवी मुंबई, राज्याला विकासात २० वर्षे पुढे नेणारे वाढवण बंदर, असा राज्याचा विकास येत्या काही वर्षांत होणार असला तरीही पर्यावरणाशी तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.