esakal | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'त्या' अंधश्रद्धेला मुठमाती
sakal

बोलून बातमी शोधा

devendra.jpg

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून बसलेल्या 'त्या' अंधश्रद्धेला मुठमाती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'त्या' अंधश्रद्धेला मुठमाती

sakal_logo
By
श्रीधर ढगे

शेगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून बसलेल्या 'त्या' अंधश्रद्धेला मुठमाती दिली आहे.

यामुळे लोकांच्या मनातील त्याचे स्थान आणखीच उंचावले आहे. शेगाव येथे आजवर सहसा कोणीही मुख्यमंत्री गजानन महाराज यांच्या मंदिरात दर्शनाला जात नव्हते. तेथे गेले की पद जाते किंवा काही तरी आपत्ती येते असे बोलल्या जात होते. बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे गेल्यावर सुद्धा पद जाते असा लोकांना गैरसमज होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिजाऊ यांच्या दर्शनासाठी गेले आणि त्यांनी हा विषय आपल्या भाषणात मांडला.

त्यांनर त्यांनी आपली कारकीर्द यशस्वी पूर्ण केली आणि  सिंदखेडराजा बाबतीत असलेल्या अफवांना पूर्ण विराम मिळाला. आता त्यानी अश्याच अफवा आणि अंधश्रद्धा झुगारून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मंत्रोपचारात त्याचे स्वागत झाले. संस्थानचे विश्वस्त नीलकंठदादा पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून 1 कोटी 11 लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्री यांना दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका जनसामान्य माणसाच्या मनात घर करून गेली. पूरग्रस्तांसाठी त्यांनी हे पाऊल उचललत खुळचट कल्पना आणि अंधश्रद्धेला मुठमाती दिली आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान सेवा, शिस्त आणि स्वच्छता यासाठी देशांत ओळखले जाते. येथे कोणत्याही प्रकारची भोंदूगिरी, लुबाडणूक नाही, विविध 42 लोकाभिमुख सेवा प्रकल्प राबविण्यात येतात.

विशेषतः संस्थान प्रसिद्धी पासून दूर राहते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने  श्री गजानन महाराज यांच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत आहे.

loading image
go to top