
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'मॅच फिक्सिंग' झाल्याच्या आरोपांना एका इंग्रजी वृत्तपत्रात लेखाद्वारे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर फडणवीस म्हणाले, “ज्या नेत्यांना जनतेने नाकारले, ते जनादेशाचा अपमान करत आहेत. लोकांना कन्व्हिन्स करता येत नसेल, तर कन्फ्यूज करण्याचे काम राहुल गांधी वेळोवेळी करतात.”