Vidhan Sabha 2019 : माझा रेकॉर्डब्रेक विजय होईल- मुख्यमंत्री (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

विधानसभा निवडणुकीत माझा रेकॉर्डब्रेक विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केला आहे. फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करताना सर्वांचे आशिर्वाद आमच्या पाठिशी आहेत. तसेच राज्यातील जनतेचे आशीर्वादही आमच्या पाठिशी आहेत असे सांगितले.

नागपूर : विधानसभा निवडणुकीत माझा रेकॉर्डब्रेक विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केला आहे. फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करताना सर्वांचे आशिर्वाद आमच्या पाठिशी आहेत. तसेच राज्यातील जनतेचे आशीर्वादही आमच्या पाठिशी आहेत असे सांगितले. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचेही आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला मिळेल. नागपूरमधील सर्वच्या सर्व 12 जागा आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यातही मोठ्या बहुमताने जिंकू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज (ता. 04) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. नागपुरमध्ये भाजपतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त अन्य दिग्गजही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्र्यासोबत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. आज भाजपची चौथी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली. परंतु, भाजपचे दिग्गज विनोद तावडे, राज पुरोहित आणि प्रकाश महेता यांना मात्र डच्चू देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis interacting with Media on filing nomination in Nagpur