
नागपूर - संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या भाजपच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्याच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. गुरुवारी (ता.५) ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजपकडून महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.