अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते: मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. टपाल तिकीट विमोचन व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरणाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते: मुख्यमंत्री

वाटेगाव : अण्णाभाऊ साठे यांनी कायम संघर्षच केला. सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य काम करणारे अण्णाभाऊ होता. भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या त्यांनी समोर आणल्या. खऱ्या अर्थाने ते वंचितांचा आवाज होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. टपाल तिकीट विमोचन व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरणाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. वाटेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारमधील अनेक मंत्रीही उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की अण्णाभाऊ साठेंनी आयुष्य कमी मिळाले. त्यांनी 49 वर्षांच्या आपल्या खडतर, संघर्षशील आयुष्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्तीचा संग्राम यामध्ये सहभाग घेतला. वंचितांचा आवाज म्हणून त्यांनी प्रचंड साहित्याची निर्मिती केली. त्यांच्या साहित्याची जगातील 27 भाषांना दखल घ्यावी लागली. महाराष्ट्राच्या इतिहासात 27 भाषांमध्ये त्यांचे साहित्य प्रकाशित झाले. जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचे साहित्य आहे. वाडमयांचे अनेक प्रकार त्यांच्या साहित्यात आहे. पोवाडे, लोकसाहित्य यांना अण्णाभाऊंनी समाजासमोर आणले. त्यांनी केलेल्या साहित्याची निर्मिती लोकांची भावना व्यक्त करणारी होती.