
मुंबई - ‘शेतकऱ्यांना कृषिकर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेबरोबरच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. जर कोणती बँक शाखा ‘सिबिल’ मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घ्यावा,’ अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तंबी दिली.