
Maharashtra Politics : पुन्हा शिंदे फडणवीसांची दिल्ली वारी; शहां बरोबर खलबतं
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौऱ्यात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील विकास कामांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचाही प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह या बैठकीतून दिसून येत आहेत. आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी यावेळी अनेक विकास कामांच लोकार्पण आणि उद्घाटन केलं.
हेही वाचा: राणेंचं भाषण...भुजबळांनी दाखवला हात अन्...विधानभवनात गोंधळ
यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला गेल्यामुळे भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर काही मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे यासंबधीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: जड वाहतूक सोलापूरकरांसाठी जीवघेणी! दोन वर्षांत १४८ मृत्यू तर १८८ जण गंभीर जखमी
तर शिवसेना हे पक्षाच नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार तर निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. तर सुप्रीम कोर्टामध्येही याबाबतची सुनावणी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.