सीमाभागातील लोकांसाठी CM शिंदेंची मोठी घोषणा; ...तर नोकरीची संधी: Maharashtra Karnataka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

Maharashtra Karnataka: सीमाभागातील लोकांसाठी CM शिंदेंची मोठी घोषणा; ...तर नोकरीची संधी

कर्नाटकविरोधातील ठराव आज एकमताने मंजूर करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील लोकांसठी मोठी घोषणा केली आहे. तसेच, सीमावादप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटूंबांना अर्थिक मदतदेखील जाहिर करण्यात आली.

आज एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक विरोधातील ठराव मांडला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. सीमाभागातील गावांच्या विकासाठी योजनांच वचनदेखील दिलं.

दरमहा २० हजार रुपयांची अर्थिक सहाय्यता अन्...

सीमाभागातील गावांच्या विकासाठी योजनांच वचन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मराठी माणसांवरील अन्याय दुर करणार. बेळगाव निपाणीसह ८६५ महाराष्ट्रात सामील करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास असल्यास सरकारी नोकरीची संधी देणार.

यासोबतच, बलिदान देणाऱ्या कुटुंबाला अर्थिक मदतीची घोषणा केली. कुटूंबाला दरमहा २० हजाराची मदत जाहिर केली. तसेच, सांस्कृतीक शैक्षणिक मदत जाहिर करण्यात आली. यासोबत सीमावरती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखून ठेवणार. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.