
CM शिंदे एक पाऊल मागे, ठाकरे सरकारच्या त्या निर्णयांवर करणार पुनर्विचार
मुंबई : राज्यातील उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर ठाकरे कुटुंबाविरुद्ध दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. तसेच शिंदे-फडणवीस सरकरकडून सत्तेत येताच मागील महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्तगिती देण्याचा सपाटा लावला होता. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे दोघे सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत का, यांचही सरकार जाईल अशी टीका केली होती. शिंदे सरकारकडून मविई सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमधील घेतलेले सर्व निर्णय केले होते.
दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत या मागच्या सरकारचे निर्णय स्थगित करण्यासंबंधी निर्णयाचा पुन्हा विचार करणार असल्याची माहिती दिली. स्थगितीची प्रकरणे वाढली तर कोर्ट केसेस ही मोठ्या प्रमाणावर वाढतील असं अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देताच ही भूमिका घेण्यात आली आहे. यानंतर सरकारकडून स्थगिती दिलेल्या कामांचा आता मुख्य सचिव पुन्हा आढावा घेणार आहेत आणि त्याच्या स्थगितीवर त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा: अजित पवारांच्या सर्वच प्रश्नांना फडणवीसांचे उत्तर, म्हणाले..
सत्ताबदल झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. तसेच मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याच्या निर्णायामुळेही विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर बोलताना मागील सरकारने शेवटी शेवटी घाईघाईत, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले होते. दरम्यान जनतेशी संबंधित आवश्यक कामांना स्थगिती देण्यात आली नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं.
हेही वाचा: मंकीपॉक्सच्या संकटादरम्यान आदर पूनावालांचे लसीबद्दल वक्तव्य, म्हणाले...
शिंदे फडणवीस सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील स्मारकाच्या कामाला स्थगिती दिल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता, यावर फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकरावर आरोप केला की, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातील कामांना स्थगिती दिली आहे, त्या कामांवर कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. दादांसारख्या (अजित पवार) व्यक्तींनी तरी फाईलवर काय लिहीलंय ते पाहावं. मी माझ्या हस्ताक्षरात लिहीलं आहे की, या कामाला स्थगिती देणं योग्य राहणार नाही, उलट या संदर्भात काय कामं हातात घेतलीयत, त्या कामांचं एक सादरीकरण माझ्या समोर आणि मुख्यमंत्रीमंत्र्यांसमोर करावं, त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचा देखील त्यात समावेश करता येईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Web Title: Cm Eknath Shinde Clarified Reconsideration Of Postponed Decisions Of Mva Chief Secretary Will Review
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..