Holi special : "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde Devendra Fadnavis celebrate celebrate Dhulwad

Holi special : "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी !

कोरोनामधल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी धुळवड राज्यभरात साजरी होत आहे. अनेक सामाजिक आणि सेलिब्रिटी धुळवड साजरी करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळवड साजरी केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर भाष्य केलं आहे. (CM Eknath Shinde Devendra Fadnavis celebrate celebrate Dhulwad)

मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात कुटूंबासोबत धुळवड साजरी करताना पाहायला मिळाले. त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे त्यांना रंग लावताना पाहायला दिसले. यावेळी त्यांचा नातूदेखील दिसला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सहपत्निक धुळवड साजरी केली.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही दिली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही धुळवड साजरी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे फडणवीस यांनी यंदा मुंबईत धुळवड साजरी केली. अशी माहिती त्यांनी स्वतः दिली.