CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; प्रकृतीबाबत डॉक्टरांशी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; प्रकृतीबाबत डॉक्टरांशी...

मुंबईः आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.

परळीतील आझाद चौकात 3 तारखेला धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. रात्री सुमारे पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं.

हेही वाचाः योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सुरुवातीला परळीत उपचार करण्यात आले. त्यानंतर लातूरला आणि आता मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात धनंजय यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आलेलं होतं. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक असून मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी त्यांची भेट घेतली.

हेही वाचा: Murder Case : ATMमध्ये कॅश भरायला गेलेल्या गार्डवर गोळ्या झाडल्या; पैसे घेऊन मारेकरी पसार

मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करुन त्यांच्याशी गप्पा मारल्या. धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती त्यांनी डॉक्टरांकडून जाणून घेतली.