
Raj Thackeray in Nagpur: CM शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा नागपुरातला मुक्काम वाढला!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या या दौऱ्यात राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेंची भेट घेतली अन् चर्चांना उधाण आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बंद दाराआड चर्चाही झाली. नक्की कोणत्या विषयांवर बोलणं झालं, याबद्दल मात्र कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे आता या भेटीबद्दलच्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
या भेटीनंतर आता राज ठाकरे आणखीही काही मंत्र्यांची आणि नेत्यांची भेट घेणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भेटीला राज ठाकरे जाणार आहेत. दरम्यान, या सगळ्या गाठीभेटींच्या सत्रामुळे राज ठाकरेंचा नागपूर मुक्कामही वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे शिजणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.