Sanjay Raut: "संजय राऊत स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या"; मुख्यमंत्र्यांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Eknath Shinde

"संजय राऊत स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या"; मुख्यमंत्र्यांचा टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे जेष्ठ नेते लिलाधर डाके यांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यानंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. डाके हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत, सेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याचबरोबर संजय राऊतांनी सत्तांतराबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी टोला लावला आहे.

(CM Eknath Shinde On Sanjay Raut)

राज्यात लवकरच सत्तांतर होईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं, त्यानंतर "संजय राऊत स्वप्न पाहतात त्यांना स्वप्नात राहुद्या." असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे. त्याचबरोबर डाके यांच्याशी झालेली भेट ही सदिच्छा भेट होती. तर सध्या त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे चौकशी करत आशिर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: "मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी"

"आनंद दिघे आणि डाके साहेबांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. डाके साहेबांनी शिवसेनेत सुरूवातीच्या काळापासून कामं केलं आहे. अत्यंत साधा आणि सरळ माणूस आहे, त्यांनी स्व:तासाठी नाहीतर शिवसेना या चार अक्षरासाठी काम केलं. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेना पुढे गेली आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांच्या भेटी आणि आशिर्वाद घेणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

शिवसेनेतल्या बंडाळीनंतर आता एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या जेष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवला आहे त्यामुळे आता जेष्ठ नेत्यांना गळाला लावण्यासाठी शिंदे प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. लिलाधर डाके यांच्या भेटीनंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.

Web Title: Cm Eknath Shinde On Sanjay Raut Changing Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..