CM एकनाथ शिंदे यांना शिवसेनेची मोठी ऑफर; तर आम्ही तिघी धुमधडाक्यात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

CM एकनाथ शिंदे यांना शिवसेनेची मोठी ऑफर; तर आम्ही तिघी धुमधडाक्यात...

संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या. जर तुम्ही मागे घेतल्यास आम्ही तिघी धुमधडाक्यात तुमच्या गटात प्रवेश करु. अशी ऑफर शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. राजकीय वर्तुळात सध्या एका पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. या पत्रातील मजकुर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (CM Eknath Shinde Shivsena offer join Shinde group sanjay raut jitendra awhad maharashtra politics crisis )

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीनावर सुटका देण्यात आली आहे. या दोन्ही घटनेचा दाखला देत नाशिकच्या माजी नगरसेविकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाच्या किरण गामणे या माजी नगरसेविकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

महोदय,

गेल्या चार दिवसात जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर व्यक्तीगत दोष मनात धरून दोन खोटे गुन्हे दाखल केले. तुरुंगात डांबले. याप्रमाणे खा. संजय राऊत साहेब यांना बेकायदेशीर अटक केली. सर्व प्रकार निषेधार्ह आहे.

मा. जितेंद्र आव्हाड व खा. संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करत मी नगरसेविका किरण दराडे व माझ्या तीन सहकारी नगरसेविका आम्ही बिनशर्त शिंदे गटात तत्काळ धुमधडाक्यात प्रवेश करू…

जय महाराष्ट्र….

किरण पुंजाराम गामणे या नाशिकमधील माजी नगरसेविका आहेत. उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या नाशिक पश्चिम भागातील त्या युवतीसेना उपजिल्हाधिकारी आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. पत्रातील मजकुर पाहता अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.