esakal | 'मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर; पक्षात आल्यावर क्लीन चिट देतात'
sakal

बोलून बातमी शोधा

'मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर; पक्षात आल्यावर क्लीन चिट देतात'

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वॉशिंग पावडर

- पक्षात आल्यानंतर आम्ही नेत्यांना स्वच्छ धुवून घेतो

- क्लीन चिट दिली जाते. मग ते कामाला लागतात

'मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर; पक्षात आल्यावर क्लीन चिट देतात'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वॉशिंग पावडर आहे. पक्षात आल्यानंतर आम्ही नेत्यांना स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते. मग ते कामाला लागतात, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षालाच 'घरचा आहेर' दिला.

नारायण राणे यांचा भाजप प्रवेश, जळगाव घरकुल गैरव्यवहार निकाल आणि भाजपमध्ये सुरू असलेले इनकमिंग यांसारख्या विषयांवर एकनाथ खडसे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही विरोधी पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांना स्वच्छ धुवून घेतो. पक्षात आल्यानंतर क्लीन चिट देतो. नंतर ते कामाला लागतात. आमचा पक्ष 'पार्टी विथ डिफरन्स' आहे.

सुरेश जैन यांच्या शिक्षेस उशीर

घरकुल गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने काल (शनिवार) निकाल दिला. यामध्ये सुरेश जैन यांना शिक्षा सुनावण्यासाठी उशीर झाला. जैन यांनी सत्ताधारी पक्षात जाऊन सातत्याने संरक्षण घेतले. त्यामुळेच याला उशीर लागला अन्यथा याचा निकाल दोन वर्षांत लागला असता, असेही ते म्हणाले.

loading image
go to top