मराठा आरक्षणामुळं रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांनी दिली नियुक्तीपत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

मराठा आरक्षणामुळं रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांनी दिली नियुक्तीपत्रे

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं रखडलेल्या प्रलंबित उमेदवारांना आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली. त्यामुळं या रखडलेल्या नियुक्तांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या नियुक्त्या रखडल्या होत्या. (CM gave appointment letters to those who stayed appointments due to Maratha reservation)

हेही वाचा: राजस्थानातील राजकीय संकटात मायावती अ‍ॅक्टिव्ह; बसपा, भाजपचा काय आहे प्लॅन?

राज्यभरात 1,064 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. या उमेदवारांना आज विविध पदांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. या पदांमध्ये तलाठी, नायब तहसीलदार, महावितरण अशा विविध पदाच्या भरत्या रखडल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा निर्णय मार्गी लावण्यात आला आहे.

हेही वाचा: Shinzo Abe : "भारतानं आपला मित्र गमावला"; शिंजो अबेंना श्रद्धांजली वाहताना PM मोदी भावूक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्यात आला.