
मुंबई - राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेत लोकाभिमुख परिवर्तन आणण्याची हमी देणारा कार्यक्रम येत्या १०० दिवसांत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. लोकाभिमुख बदलातून राज्यातील जनतेला कोणत्याही कामासाठी मंत्रालयात येण्याची गरज पडू नये, अशी व्यवस्था तयार करण्याची सूचना त्यांनी सचिवांना दिल्या.