esakal | खासदार भावना गवळींना वर्षा बंगल्यावर नो एंट्री? अर्धा तास वाट पाहून परतल्या माघारी
sakal

बोलून बातमी शोधा

bhavana gawali

खासदार गवळींना वर्षा बंगल्यावर नो एंट्री? गेटवरूनच परतल्या माघारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (shivsena mp Bhavana Gawali) या आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळेल यासाठी अर्धा तास वाट पाहिली. त्या अर्धा तास गेटवर ताटकळत उभ्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना कुठलीही भेट देण्यात आली नाही. त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिले आहे.

हेही वाचा: गडकरींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोक करतायेत: भावना गवळी;पाहा व्हिडीओ

खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. तेव्हापासून गवळी ईडीच्या रडारवर असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा ईडीकडून केली जात आहे. याच प्रकरणात भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला १ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे भावना गवळींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावली आहे.

ईडीकडून भावना गवळींच्या निकटवर्तीयांना अटक केल्यानंतर गवळींच्या अडचणी वाढणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच ''भावना गवळी या आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षी बंगल्यावर आल्या होत्या. मात्र, अर्धा तास गेटवर ताटकळत उभं राहूनसुद्धा त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलाही निरोप मिळाला नाही. त्यामुळे गेटवरूनच त्या माघारी फिरकल्या'', असं 'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

loading image
go to top