एकनाथ शिंदे चिडले, ''मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं, पण जेव्हा त्यांना द्यायची वेळ आली तर हे तेढ निर्माण...'', मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर थेटपणे भाष्य केलं आहे. ज्या मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं त्या मराठा समाजाला आज जेव्हा देण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा समाजात तेढ निर्माण करणं चुकीचं आहे.. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे.
eknath shinde on maratha reservation
eknath shinde on maratha reservationesakal

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर थेटपणे भाष्य केलं आहे. ज्या मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं त्या मराठा समाजाला आज जेव्हा देण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा समाजात तेढ निर्माण करणं चुकीचं आहे.. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे.

प्रतापगडावरील गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. मागच्या ३९ वर्षांपासून रायरेश्वर ते प्रतापगड अशी पायी दौड तरुण करत असतात, तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.. असं यावेळी शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या टीका टिपण्णीवरुन माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आणि ओबीसींसह इतर समाज घटकांवर अन्याय न होऊ देणारं आरक्षण सरकार देणार आहे.

eknath shinde on maratha reservation
Ind vs Eng 1st Test Day 4: पदार्पणातच टॉम हार्टलीच्या 7 विकेट्स; भारताचा पहिल्या कसोटीत पराभव

राज्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडू लागलेल्या आहेत, त्यासंदर्भात नोटिफिकेशनदेखील काढण्यात आलंय. आरक्षणाची स्पष्टता येण्यासाठी कालचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं असून समाजाला न्याय मिळावा, अशी सरकारची भूमिका आहे.

शिंदे पुढे म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळावा, अशी सगळ्यांचीच भूमिका असूनही काही लोक वेगळी विधानं करत आहेत. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली.. अशी विधानं करणं चुकीचं आहे. मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं. परंतु जेव्हा मराठ्यांना देण्याची वेळ आली तेव्हा असं बोलू नये. हे सरकार सगळ्यांचं आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम कुणीही करु नये.

eknath shinde on maratha reservation
Allahabad High Court: नोकरी नसेल तर मजूरी करा पण पत्नीला भत्ता द्या; उच्च न्यायालयाचा आदेश

राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या कुणबी नोंदीसंदर्भातील अधिसूचनेवरुन नाराजी व्यक्त केली होती. नारायण राणे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर भुजबळांच्या निवासस्थानी सायंकाळी ५ वाजता ओबीसी नेत्यांची बैठक सुरु झालेली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे होता, असा प्रश्न उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com