ठाकरे, फडणवीस, वडेट्टीवार सोमवारी सोलापूर दौऱ्यावर ! पाहणी न करताच मंत्री गडाख उस्मानाबादला 

cm and devendra fadanvis
cm and devendra fadanvis

सोलापूर : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सोमवारी (ता. 19) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नऊ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहाकडे जाणार आहेत.

त्यानंतर साडेनऊ वाजता मोटारीने सांगवी खूर्द (ता. अक्कलकोट) येथील नुकसानीची पाहणी करतील. ग्रामस्थांशी चचा करुन ते सकाळी 11 वाजता सांगवी पूल, बोरी नदी व पूरग्रस्तांशी संवाद साधून अक्‍कलकोटमधील हत्ती तलावाची पाहणी करणार आहेत. पावणेबारा वाजता अक्कलकोटहून रामपूरला जाणार असून बोरी उमरगे येथील नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी तीन वाजता पूर परिस्थितीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुन्हा ते सोलापुरकडे रवाना होणार आहेत.

मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. बारामतीमार्गे ते कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा येथून उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते मंगळवारी (ता. 20) उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी (ता. 21) ते हिंगोली, जालना, औरंगाबादचा दौरा करणार आहेत. तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 किलोमीटरचा प्रवास करुन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही सहभागी होतील. टेंभुर्णी येथील संयुक्त पाहणी दौऱ्यानंतर फडणवीस हे करमाळा, परांड्याला जाणार आहेत. तर श्री. दरेकर हे पंढरपूर पूर परिस्थितीची पाहणी करुन सायंकाळी सोलापुरात मुक्‍कामी असणार आहेत. त्यानंतर मंगळवारी (ता. 20) ते सकाळी आठ ते अकरा या वेळेत अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत पूर परिस्थितीची माहिती घेतील. यावेळी आमदार, खासदार आदी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी सांगितले. तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार हेही पंढरपूर परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. 

ठळक बाबी... 

  • अतिवृष्टी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोमवारी (ता. 19) सोलापूर दौऱ्यावर 
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडामार्गे उस्मानाबादकडे जाणार 
  • आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवारही सोलापूर दौऱ्यावर; नुकसानीची करणार पाहणी 
  • मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सोलापुरमार्गे उस्मानाबादला रवाना; सोलापुरात पाहणी केलीच नाही 
  • - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सोमवारी साधणार शेतकऱ्यांशी संवाद 

 
मृद व जलसंधारणमंत्री पाहणी न करताच उस्मानाबादला 
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे शनिवारी (ता. 17) सोलापुरमार्गे उस्मानाबादला रवाना झाले. उद्या (रविवारी) ते नगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून नुकसानीची पाहणी करणार आहेत. मात्र, श्री. गडाख यांनी सोलापूर विमानतळावरुन मोटारीने उस्मानाबादला जाणे पसंत केले. त्यांना सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही गावातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com