मान मोडून काम केल्याने मानेचे दुखणे - मुख्यमंत्री ठाकरे| CM Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मान मोडून काम केल्याने मानेचे दुखणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मानेच्या दुखण्यामुळे पुढील दोन दिवस रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी जनतेला भावनिक असं आवाहन केलं आहे.

मान मोडून काम केल्याने मानेचे दुखणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - मानेच्या दुखण्यामुळे पुढील दोन दिवस रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी जनतेला भावनिक असं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, मी पुन्हा सेवेत रुजू होईन. या काळात लसीकरण सुरु ठेवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी पत्राद्वारे संवाद साधला. यात मुख्यमंत्र्यांनी मी रुग्णालयात दाखल होत असून दोन ते तीन दिवस रुग्णालयात असणार आहे असं म्हटलं आहे. .

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता. साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.

हेही वाचा: "संप मागे घेण्याबाबत कृती समितीने कामगारांना समजावून सांगावे"

आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे. यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो असं आवाहनही मुख्यंंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

गिरगावातील एचएन रुग्णालयात मुख्यमंत्री उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी गेले होते. तेव्हा तिथले उपचार अद्यापही सुरु आहेत. पाठीला लेप लावण्यापासून ते मानेला पट्टा लावण्यापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचाही सल्ला दिला होता.

loading image
go to top