
मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 24 तारखेला होणार असल्याचे समजते. त्यानंतर पुढील वर्षांत ठाकरे सरकारचा गतिमान कारभार सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे पहिले सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून, आता सारे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 24 तारखेला होणार असल्याचे समजते. त्यानंतर पुढील वर्षांत ठाकरे सरकारचा गतिमान कारभार सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मुख्यमंत्र्यांबरोबरच तिन्ही पक्षांमधील अनुभवी आणि ज्येष्ठ अशा सहा मंत्र्यांचा शपथविधी शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर लगेच नागपूरला हिवाळी अधिवेशनास जाण्याची लगबग सुरू झाली. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला.
अधिवेशनानंतर 24 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच सरकार पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात करेल. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरकारच्या कामाला वेग येईल, अशी शक्यता आहे.