esakal | मास्क वापरावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray

 मास्क वापरुन लॉकडाऊनची नामुष्की आपल्याला टाळायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

मास्क वापरावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे (VIDEO)

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

राज्यात कोरोनाची दुसरी लाट उसळण्याची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. सध्याच्या घडीला राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी राज्यात दुसरी लाट उसळली असा अनुमान लावता येणार नाही.  मास्क वापरुन लॉकडाऊनची नामुष्की आपल्याला टाळायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे. राज्यात राजकीय सभा, सार्वजनिक आणि सामाजिक कार्यक्रमास सोमवारपासून निर्बंध घालण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्रांनी म्हटले आहे. जाणून घेऊयात मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 • लॉकडाउन नको असेल तर मास्क घाला राज्यातील जनतेला आवाहन
 • गर्दी टाळण्यासाठी राज्यातील सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुकांवर उद्यापासून काही दिवसांसाठी बंदी 
 • अमरावती जिल्ह्यात उद्या संध्याकाळपासून काही बंधने अंमलात आणण्याच्या सूचना
 • पुन्हा एकदा काही ठिकाणी बंधने पाळावी लागतील 
 •  मास्क घालणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणारच 
 • संसर्गाची साखळी तोडण्याचे पुन्हा एकदा आपल्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. 
 • राज्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढल्यानंतर दुसरी लाट आली असे म्हणता येणार नाही. पुढील दोन आठवड्याची परिस्थितीवर सर्व काही अवलंबून असेल.   
 • आणखी दोन-तीन कंपन्या लसनिर्मितीसाठी पुढाकार घेत असून लवकरच जनतेपर्यंत लस पोहचेल 
 • कोविड योद्ध्यांनी  लस टोचून घेताना मनात कोणतीही भीती बाळगू नये  
 • कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.
 • पुन्हा घरात बंद होण कोणालाही आवडणार नाही 
loading image