esakal | वचन मोडल्यावर दुसरा पर्याय नव्हता, म्हणून... : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

दोन भावांकडून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न
लोकसभा निवडणुकीवेळी मी अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी गेलो होतो. माझ्या मनात काहीही नव्हते. लोकसभेला मी भाजपचा प्रचार केला. मोदींनी मला छोटा भाऊ म्हणत होते. पण, दुसरीकडून असा प्रयत्न झाला नाही. तर, देवेंद्र फडणवीस मला मोठा भाऊ म्हणत होते. पण, दोन्ही भावांनी मला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. आमच्या हिंदुत्वात वचन देणे आणि पाळणे हे महत्त्वाचे आहे. मी सत्तेवर येईन असे कधीही बोललो नव्हतो. मला वाटत नाही, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काटेरी असते.

वचन मोडल्यावर दुसरा पर्याय नव्हता, म्हणून... : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसविणे हे मी बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन आहे. शिवसेनाप्रमुखांनी कधीची सत्तेचे पद स्वीकारले नाही. माझीही अशी इच्छा नव्हती. पण, मला मोठी जबाबदारी स्वीकारल्याशिवाय पर्याय नव्हता. वचन मोडल्यावर माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. मुख्यमंत्री होण्याचे कधीच माझे स्वप्न नव्हते. मी वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी काहीही करेन असे म्हटले होते. मी मुख्यमंत्री झालो म्हणजे वचन पूर्ण झाले असे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नापासून भाजपने दिलेले वचन कसे मोडले यावर त्यांनी भाष्य केले. संजय राऊत यांनी यापूर्वी काही गोष्टीवर न झालेल्या गोष्टींवर प्रकाश टाकला आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्धव ठाकरे म्हणाले, की मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे. त्यांना अनेकांनी धक्के देण्याचा प्रयत्न केला. पण, तसे झाले नाही. बाळासाहेबांनी दिलेल्या धक्क्यातून अजून काहीजण सावरले नाहीत. महाराष्ट्रात षडयंत्र झाले पण ते उधळून लावले. जनतेला हे आवडले की नाही माहिती नाही. पण, वचन देणे आणि ते निभावणे हे महत्त्वाचे आहे. भाजपने दिलेले वचन पाळले असते तर काय झाले असते. मला, आता माहिती नाही ते या धक्क्यातून सावरले आहेत की नाहीत. धक्का कोणी दिला हे महाराष्ट्र पाहत आहे. 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या वाढदिवशी अनेक जण भेटीला येत होते. यंदाची त्यांची जयंती वेगळी होती. मातोश्री आणि शक्ती या दोन गोष्टी नेहमीच एकत्र राहिल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी झेपेल की नाही हे मला माहिती नव्हते. जबाबदारी स्वीकारून अभ्यास करून काम करणे हेच मी नेहमी करत असतो. 