शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सोबतीला शिवसेना असं वेगळ्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारसरणी जवळपास एकच आहे. पण, यात शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. त्यामुळं हे राजकीय समीकरण जुळलंच कसं? असं कोडं सगळ्यांना पडलंय. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्वाचं काय? असाही एक प्रश्न सगळ्यांना पडलाय. त्यावर आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विधानसभेत खुलासा केला आहे.

मुंबई - महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सोबतीला शिवसेना असं वेगळ्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारसरणी जवळपास एकच आहे. पण, यात शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. त्यामुळं हे राजकीय समीकरण जुळलंच कसं? असं कोडं सगळ्यांना पडलंय. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्वाचं काय? असाही एक प्रश्न सगळ्यांना पडलाय. त्यावर आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विधानसभेत खुलासा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

'आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि सोडणार नाही,' असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी दिलेला शब्द पाळणं म्हणजे हिंदुत्व, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाताना शिवसेनेनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या चरणी हिंदुत्व लीन केलं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं नसल्याचं स्पष्ट केलंय.

हे वाचा :  विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच

उद्धव ठाकरे म्हणाले, 'आम्ही हिंदुत्वाच्या विचारसरणीवर ठाम आहोत आणि आम्ही ते सोडणार नाही. मुळात देवेंद्र फडणवीस हे आमचे चांगले मित्र आहेत. गेल्या पाच वर्षांत मी त्यांच्याकडून बरच काही शिकलो. पाच वर्षांत मी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कधी विश्वासघात केला नाही. मी स्वतःला नशीबवान समजतो. ज्यांना सोबत घेऊन मी लढलो. ते आज माझ्या विरोधात आहेत. तर ज्यांच्याशी लढलो ते आज सोबत आहेत. मी तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) विरोधीपक्ष नेता म्हणणार नाही. तर, मी तुम्हाला एक जबाबदार नेता म्हणेन. जर, आमच्याशी तुम्ही चांगले वागला असता तर हे घडलंच नसतं.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray says will not leave hindutva ideology