
मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची वरचेवर भेटत होत असते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची घेणार भेट
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (शुक्रवार) सायंकाळी 5 वाजता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता (Justice Dipankar Datta) यांची भेट घेणार आहेत. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं समजतंय. ही भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा आपल्या निवासस्थानी परतणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य न्यायमूर्ती दीपांकर यांची वरचेवर भेटत होत असते. कधी प्रशासकीय कामांसाठी, तर कधी विविध चर्चांसाठी ते एकमेकांना भेट असतात. ही भेट नियोजित असून कुठलंही कारण दोन्ही बाजूकडून स्पष्ट करण्यात आलं नाहीय. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सायंकाळी 5 वाजता उच्च न्यायालयाच्या (High Court) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतील, असं सांगण्यात आलंय.
हेही वाचा: शाळेत विद्यार्थ्यांना मुस्लिम टोपी घालण्याचे आदेश, मुख्याध्यापिकेविरुध्द गुन्हा
Web Title: Cm Uddhav Thackeray Will Meet Chief Justice Dipankar Dutta Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..