CMO replies To Actor Pawan Kalyan tweet For Help
CMO replies To Actor Pawan Kalyan tweet For Help

Coronavirus : उद्धव ठाकरे म्हणतात, पवन जी, तुम्ही काळजी करू नका !

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देश २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात बाहेरील राज्यातील अनेक नागरिक मुंबईत अडकले असून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यात आंध्र प्रदेशमधील काही कुटुंबांचा समावेश असून दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्यासाठी मदत मागितली. मुख्यमंत्र्यांनीही मदत करु, असं तात्काळ आश्वासन दिले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माननीय, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात लॉकडाउन केल्यानंतर मुंबईतील गोमाहल्ली (पश्चिम) येथे आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यातील अलूरु, अडोनी, मंत्रालयम, येम्मीनागनुर विधानसभा मतदार संघातील रोजंदारीवर काम करणाऱ्या ५०० पेक्षा जास्त कुटुंब अडकले आहेत. सध्या त्यांना मुलभूत गरजाही मिळत नाहीयेत. त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कृपया या नागरिकांची मदत करा' असं ट्विट करत पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. विशेष म्हणजे त्यावर उद्धव ठाकरे यांनीही लगेच मदत करु असं सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी पवन कल्याण यांना उत्तर देताना म्हटले आहे की, 'पवन जी, तुम्ही काळजी करू नका. या संकटाच्या काळात अडचणीत असलेल्या सर्वांची मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना त्वरित मदत पोचवली जाईल' असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com