CNG-PNG Price Hike: महागाईचा भडका! ऐन सणासुदीत सीएनजी, पीएनजी दरात मोठी वाढ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cng png price hike natural gas prices hiked CNG by 6 rupees and png by 4 rupee

CNG-PNG Price Hike: महागाईचा भडका! ऐन सणासुदीत सीएनजी, पीएनजी दरात मोठी वाढ!

मुंबई : ऐन सणासुदीच्या दिवसात सामान्य नागरिकांच्या खिशावर पुन्हा एकदा भार वाढणार आहे. आज सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सिटी गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लि. (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपयांनी वाढ केली आहे.याशिवाय, पाइप्ड कुकिंग गॅस (PNG) च्या किमतीत प्रति युनिट ४ रुपये (SCM) वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील. 

मागच्या काही दिवसांपासून युक्रेन रशिया यांच्या युध्दानंतर नॅचरल गॅसच्या किंमती सतत वाढत आहेत. आजपासून महानगर गॅसने सीएनजीच्या किंमती ६ रुपये प्रतिकिलो तर घरगुती गॅस(PNG)च्या किंमती ४ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील वाहनांसाठी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किरकोळ किंमत ८६ रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच वेळी, घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम ५२.५० रुपये असेल.सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे की सरकारने १ ऑक्टोबरपासून गॅसच्या किमती ४० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे. म

हेही वाचा: National Herald Case: 'ईडी'कडून पाच काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी समन्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने वायूच्या दरात १ ऑक्टोबरपासून ४० टक्के वाढ केली आहे. त्याचवेळी महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे कंपनीला महागड्या दराने बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. त्याचा परिणाम म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे. आता मुंबई शहर व परिसरात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो व पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम असेल.

हेही वाचा: Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ताही द्या'

टॅग्स :cngPNG