
आघाडी सरकार जून महिन्यात कोसळण्याचे नारायण राणेंचे भाकीत
वाशीम : राज्यातील आघाडी सरकार तीन फांद्याचे झाड आहे. जून महिन्यात राजकीय वादळ येवून हे आघाडी सरकार कोसळेल, असे वक्तव्य केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेला प्रशासन चालवता येत नाही. मुख्यमंत्री पद सांभाळणे शिवसेनेचा आवाका नाही. अडीच वर्षांत मुख्यमंत्री फक्त एकदा मंत्रालयात येतात.
दोन तासांत फाईल निकाली काढल्याचे सांगतात यावरूनच त्यांचा प्रशासकीय अनुभव तोकडा असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना विचारणा केली असता जे भोंगे नियमानुसार नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Web Title: Coalition Government Collapse June Alliance Government State Three Branched Tree Alliance Government Collapse June Predicts Narayan Rane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..