esakal | Uday Samant : महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम
sakal

बोलून बातमी शोधा

college

महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे राज्यातील महाविद्यालये बंद होते. शाळा सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार? असा प्रश्न होता. मात्र, आता राज्यातील महाविद्यालये सुरू होण्याची (college start date) तारीख अखेर ठरली आहे. येत्या २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (minister uday samant) यांनी सांगितले. त्यासाठी काही नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे.

असे असतील नियम -

  • ५० टक्के व त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यापीठाने निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानुसार नियम तयार करावे.

  • महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले पाहिजे. डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयाने पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करावे, त्याबाबात सूचना देण्यात आल्या आहेत.

  • ज्या परिसरात कोरोना अजूनही आहे त्याठिकाणी स्थानिक पातळीवरून महाविद्यालये सुरू करायचे की नाही याबाबत निर्णय घ्यावा. विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नियमावली जाहीर करावी. प्रत्येक ठिकाणी कुठली नियमावली लागू करावी, हे विद्यापीठाने ठरवावे.

  • ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांच्यासाठी महाविद्यालयाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

  • वसतीगृहांच्या संबंधित मोठा प्रश्न आहे. टप्प्याने वसतिगृह सुरू केले जाते. मात्र, वसतिगृहे सुरू करण्यापूर्वी त्याचा आढावा घ्यायचा आहे.

  • शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील कर्मचारी त्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले पाहजे. त्याचा अहवाल शासनाला पाठवावा.

  • दोन डोस ज्यांना घेतले आहेत त्यांनी महाविद्यालय परिसरात येताना कोरोना नियमांचे पालन करावे. ज्यांचे डोस पूर्ण झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेऊन महाविद्यालयात लवकर यावे.

loading image
go to top