महाविद्यालयांत व्यायामशाळा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई - विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘व्यायामाचा तास’ सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सप्टेंबरमध्ये दिले होते. हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यूजीसीने नुकतेच महाविद्यालय व विद्यापीठांना फिटनेस क्‍लब सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्यायामशाळेच्या प्रमुखपदी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच खेळाची आवड असणारे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सदस्य  म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच खेळांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून फळी तयार करण्यात यावी. स्वयंसेवक व क्रीडा शिक्षकांवर अन्य विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यासाठी  विविध कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

स्पर्धांचे आयोजन
प्रत्येक शिक्षण संस्थेने वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यातून राज्य व राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील क्रीडापटू घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व वर्षाचे नियोजन करून त्याचा अहवाल जानेवारी २०२० पर्यंत यूजीसीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colleges and universities have issued guidelines to start a fitness club