
पुणे - ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अनुषंगाने आणि शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांना अनुरूप कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम १९९७, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम १९८९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड अधिनियम २०१४ आणि सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ पुणे अधिनियम २०२२ मध्ये आवश्यकतेनुसार बदल होणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकारने जळगाव येथील एम. जे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिल राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.