
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट-किल्ल्यांना वेढलेल्या अतिक्रमणांवर आता राज्य सरकारचा हातोडा पडणार आहे. गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, जानेवारीअखेर प्रत्येक किल्ल्याच्या परिसरातील अतिक्रमणांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर त्यावर बुलडोझर फिरणार आहे.