मोठी बातमी ! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण; पण निकाल... 

EXM_20Result.jpg
EXM_20Result.jpg

सोलापूर : कोरोनामुळे (लॉकडाउनमुळे) दहावीच्या उत्तरपत्रिका लॉकडाउनमध्ये अडकल्याने यंदा निकालास विलंब लागला. तर उत्तरपत्रिका तपासणीही वेळेत होऊ शकली नाही. 5 जूनपासून लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीस वेग आला आणि उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आता बोर्डाने अंतिम निकालाच्या दृष्टीने कामकाजाला सुरवात केली आहे. मात्र, काही शहरांमध्ये पुन्हा कडक लॉकडाउन केल्याने निकाल जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागेल, अशी शक्‍यता बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली. 

दरवर्षी 15 जूनपर्यंत बारावीचा निकाल जाहीर केला जातो, परंतु यंदा लॉकडाउनमुळे उत्तरपत्रिका तपासणीस विलंब झाल्याने निकाल लांबणीवर पडला. दहावीचा भुगोल पेपर लॉकडाउनमध्ये अडकला आणि शेवटी तो पेपर रद्द करुन अन्य विषयांच्या सरासरीनुसार भुगोल विषयाला गुण द्यावे लागले. दरम्यान, 1 ऑगस्टपासून अकरावी प्रवेशाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. तर बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बारावीचा निकाल आता 20 जुलैपर्यंत तर तर दहावीचा निकाल जुलैअखेर जाहीर करण्याच्यादृष्टीने बोर्डाने तयारी सुरु केली आहे. मात्र, निकालास विलंब झाल्यास प्रवेशाचे नियोजित वेळापत्रक कोलमडणार असून त्यात पुन्हा फेरबदल करावे लागतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. 

उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण: आता अंतिम निकालाची तयारी 
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाने तयारी सुरु केली आहे. निकालाची अंतिम तारीख बोर्डाकडून काही दिवसांत जाहीर केली जाईल. 
- डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 

कडक लॉकडाउनमुळे लागणार विलंब 
पुणे, सोलापूरसह अन्य काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने त्याठिकाणी काही दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. त्याचा परिणाम निकालाच्या कामकजावर होत असून निकालास थोडासा विलंब होण्याची शक्‍यताही व्यक्‍त करण्यात आली आहे. पूर्वीच्या लॉकडाउनमध्ये शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीस विलंब झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. आता पुन्हा कडक लॉकडाउनमुळे निकालास काही दिवस विलंब होणार आहे. त्यामुळे अकरावी व बारावीनंतरच्या प्रेवश प्रक्रियेच्या वेळापत्रक बदल करावा लागण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com