Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज (ता.29) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 51 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी छाननी समितीच्या बैठकीनंतर 20 सप्टेंबरला यादी जाहीर होईल, असे सांगितले होते. परंतु, ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज (ता.29) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 51 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी छाननी समितीच्या बैठकीनंतर 20 सप्टेंबरला यादी जाहीर होईल, असे सांगितले होते. परंतु, ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच काँग्रेस आपली पहिली उमेदवार यादी जाहीर होणार असून यामध्ये अनेक बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

पहिल्या यादीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून के.सी. पाडवी, बुलढाणा मतदारसंघातून हर्षवर्धन सपकाळ, रावेर मतदारसंघातून शिरीश चौधरी, भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पलूस, कडेगांवमधून विश्वजित कदम, संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे आदींची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress announces first list of candidates for Assembly elections of Maharashtra