
विधान परिषदेसाठी काँग्रेसची यादी जाहीर; भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे उमेदवार
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, काँग्रेसनेही उमेदवार घोषित केले आहेत.
काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसक़डून मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
हेही वाचा: भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंचा पत्ता कट
भाजपाने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंकजा मुंडेंना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर यांच्याबद्दल संभ्रमात आहे.
Web Title: Congress Candidates For Mlc Election 2022 Bhai Jagtap Chandrakant Handore Mohan Joshi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..