RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवरून फडणवीस आक्रमक; पटोलेंवर सांतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवरून फडणवीस आक्रमक; पटोलेंवर सांतापले

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या कार्यालयावर छापे टाकल्यानंतर १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर या संस्थेकडून राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवाया करण्यात येणार असल्याचे खुलासे झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं पाहिला मिळत आहे.

आणि आता काँग्रेसने वादात उडी घेतली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यांनी नाना पटोले यांना अत्यंत कडक शब्दात उत्तर दिले आहे.

हेही वाचा: Ration: मोदी सरकारची मोठी घोषणा! देशवासीयांना मोठा दिलासा

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक संघावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, परंतु आतापर्यंत संघानं असा एक तरी प्रकार केलाय का जो पीएफआयनं केलाय?, भारतात कायदा आहे, संविधान आहे. कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. संघावर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या लोकांकडे अक्कल कमी असल्यानं मी त्याच्यावर फार काही बोलणार नाही. असे मुर्खांसारखे बोलणारे लोक खुप आहेत. आशा शब्दात पटोले यांना सुनावले आहे.