भाजपचा सुफडा साफ; काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

तिवसा पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि विरोधकांचा सुफडा साफ करत सहाही जागांवर विजय मिळवला आहे. पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती, हे विशेष. तिवसा पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसने सर्वच म्हणजे सहाही जागा जिंकल्या.

तिवसा : पंचायत समितीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीनंतर आठ डिसेंबरला शांततेत मतदान पार पडले. निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणूक काळात प्रचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. प्रत्येक उमेदवारांना मतदार राजाचे मन जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी आश्‍वासनाची बरसात करावी लागली होती. त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली होती. मात्र, सोमवारी लागलेल्या निकालात कॉंग्रेसने तीन पैकी दोन पंचायत समितीवर विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

तिवसा पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि विरोधकांचा सुफडा साफ करत सहाही जागांवर विजय मिळवला आहे. पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती, हे विशेष. तिवसा पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसने सर्वच म्हणजे सहाही जागा जिंकल्या.

अजित पवार म्हणतात एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या

तिवसा पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वच म्हणजे सहाही जागा जिंकल्या. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांचे दमदार, विकासाभिमुख नेतृत्व पुन्हा एकदा या निमित्याने अधिरेखित झाले आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये तब्बल तिसऱ्यांदा विजयाचा इतिहास घडवणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढल्या गेल्याने याचे निकाल काय लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत; केले बाजूने मतदान

राज्यातील सत्ता गेल्याने आधीच कोमात गेलेले भाजप नेते; मात्र काही चमत्कार घडेल या भ्रमात होते. तिवसा पंचायत समितीच्या वरखेड, मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा, तळेगाव ठाकूर, मार्डी या सहा सर्कलचा समावेश आहे. यामध्ये कॉंग्रेसने सर्वच ठिकाणी नेत्रदीपक विजय मिळविला. यामध्ये तळेगाव ठाकूरमध्ये कल्पना किशोर दिवे, वरखेडमध्ये रोशनी मुकुंद पुनसे, वऱ्हामध्ये नीलेश वासुदेवराव खुळे, मोझरीमध्ये शरद वासुदेवराव मोहोड, मार्डीमध्ये शिल्पा रवींद्र हांडे, कुऱ्हात मुल्ला इसाक हे विजयी झाले. अपेक्षेप्रमाणे भाजपचा मात्र पुरता सुपडा साफ झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress gives Clean sweep to BJP in Tiosa panchayat Samiti in Amravati District