Ashish Deshmukh
Ashish DeshmukhEsakal

Ashish Deshmukh: हाकलपट्टीच्या चर्चेदरम्यान भाजपच्या बड्या नेत्यासोबत आशिष देशमुखांची ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी'

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. देशमुख यांनी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्ये केल्यामुळे आशिष देशमुख यांना काँग्रेसने नोटीस दिली होती. त्याला देशमुख यांनी उत्तरही दिलं आहे. या नोटिशीवर अजून कोणताही निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला नाही.

दरम्यान या घडामोडी घडत असतानाच आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत. देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी देशमुख-बावनकुळे यांच्या भेटीचे आगामी काळात परिणाम दिसतील असं सांगितलं जात आहे.

आशिष देशमुख आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. चहा घेतला आणि चर्चाही केली. आशिष देशमुख हे बावनकुळे यांच्या कार्यालयात तब्बल अर्धा ते पाऊणतास होते.

Ashish Deshmukh
Cheetah Death : दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू

या भेटीनंतर आशिष देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे हे आमच्यासोबत आमदार होते. मंत्री होते. आमचे त्यावेळचे ऊर्जावान ऊर्जा मंत्री होते. नागपूरसाठी पालकमंत्री त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं. नागपूरच्या कोराडी येथील कार्यालयात त्यांनी मला नाश्त्यासाठी बोलावलं. त्यासाठी मी आलो होतो. बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आमचे जीवलग मित्र आहेत. ते विधानपरिषदेत आहेत. त्यामुळे काही कामे असतात. त्यांनी नाश्त्याला बोलावलं म्हणून नाही म्हणता आलं नाही, तर आशिष देशमुख बोलताना म्हणाले मला काँग्रेस काढून टाकेल असं मला वाटतं नाही असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.

Ashish Deshmukh
Pune Accident: किंचाळण्याचा एकच कल्लोळ अपघातात जखमी महिलेने सांगितला थरारक अनुभव

तर काँग्रेसने दिलेल्या माझ्या निलंबनाच्या नोटिसला उत्तर दिलं आहे. त्यावर कारवाई झाली नाही. कारवाई होणार नाही. माझं मत पक्षाला पटलं आहे, असं माझं मत आहे, असं काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

तर माझ्या या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. नाश्ता, चहाचा अस्वाद घ्यावा म्हणून आलो होतो. बावनकुळे यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून आलो होतो, भाजपच्या नागपूर ग्रामीणची बैठक असली तरी त्याचा या भेटीशी संबंध नाही. त्यांनी नाश्त्याला बोलावलं आणि मी आलो. कालच येणार होतो. पण ते गडबडीत होते. ते म्हणाले, नाश्त्याला ये म्हणून आलो, असंही त्यांनी सांगितलं.

Ashish Deshmukh
Amit Shah: सहकाराच्या राजकारणात भाजप उतरणार ताकदीने; मास्टर प्लॅन अमित शहा बनवणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com