Ashok Chavan: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; अशोक चव्हाण ११ आमदारांसोबत भाजपच्या वाटेवर? चर्चांना उधाण

Former Maharashtra CM Ashok Chavan Quits Congress, Resigns as MLA : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
nanded
nandedsakal

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. तर ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहे. नांदेडमध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे. तर मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी भाजप करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.

nanded
Edible Oil: खाद्यतेलाच्या किंमती वाढणार? केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, तेल आयात शुल्क वाढीवरही उचललं पाऊल

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांची ओळख आहे. अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यांच्यामध्ये या भेटीवेळी चर्चा झाली. ते सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत.

nanded
Manoj Jarange: 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, प्रकृती खालावली; सरकारला दिला इशारा; म्हणाले, १५ तारखेनंतर...

राहुल नार्वेकर यांचा काल रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी 'भावी खासदार' असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत. (Congress Leader Ashok Chavan may join BJP give MLA resignation meets Rahul Narwekar in Mumbai)

nanded
Rain In 2024: यंदाच्या वर्षी देशात पडणार धो-धो पाऊस; ‘एल निनो’चा प्रभाव कमी होणार असल्याचा चांगला परिणाम

तर, आज अशोक चव्हाण याचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. सोबत काँग्रेसचे आमदार आहेत अशी माहितीही काही माध्यमांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत 11 आमदार असल्याची माहिती साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com