Madh Studio Scam I अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार? मढ कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी पर्यावरण खात्याची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madh Studio Scam notice to aslam shaikh

अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार? मढ कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी पर्यावरण खात्याची नोटीस

मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयानं कॉंग्रेसचे नेते अस्लम शेख नोटीस जारी केली आहे. त्यामुळे अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला देशपातळीवर कॉंग्रेस आक्रमक झाली असून आता शेख यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पर्यावरण विभागानं मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Madh Studio Scam notice to aslam shaikh)

यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात की, अस्लम शेख - मढ मार्वे 1000 कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितलं. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: Amit Shah: हजारो वर्षांपासूनची संस्कृती वाचवू शकलो नाही तर, आपण स्वराज्य मिळवू शकू का?

याप्रकरणी कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी 300 कोटींची कागदपत्र आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यामध्ये CRZ च्या नियमांच उल्लघन केलं असून गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली आहे. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचं सांगितलं जातं आहे. मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. याला पर्यावरण विभागानं सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणीसाठी परवनगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणात कोस्टल झोन ऑथेरीटी यांना पत्र लिहिलं आहे. यावर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचा: IND vs WI: रवींद्र जडेजाने गुजराती बापूचे करिअर केले उद्ध्वस्त

दरम्यान, सोमय्यांच्या आरोपानंतर अस्लम शेख यांनी अवघ्या दोन दिवसांतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अस्लम शेख यांच्यासोबतच भाजप नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. एकाच गाडीतून हे दोघेही फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला होता.

Web Title: Congress Leader Aslam Shaikh Give Notice From Environmental Department In Madh Studio Scam Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..