नाना पटोले, बाळासाहेब थोरात फडणवीसांच्या भेटीला; चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु आहे.
Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra Fadanvis
Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra FadanvisTeam eSakal

मुंबई: महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत कोणत्या मुद्यावरून राजकारण तापेल ? नेम नसतो. मात्र, राज्यसभा निवडणूक टाळण्याच्या हेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली; राज्यसभा पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची गळ पटोलेंनी फडणवीस यांना घातली. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीतील सदस्यांशी चर्चा करून निर्णय कळू, असा सावध निरोप फडणवीस यांनी काँग्रेस पटोले, थोरातांना दिला.

काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांना उमेदवारी अर्ज भरला आहे. अशा पोटनिवडणुका बिनविरोध करणाऱ्याची परंपरा असल्याचे सांगत, भापजने माघार घेण्याची अपेक्षा कॉंग्रेस नेत्यांची आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका सारखीच आहे. परंतु, भाजपचे संजय उपाध्याय यांनी अर्ज भरल्याने निवडणूक होण्याचे संकेत आहेत. तर पक्षातील वरिष्ठांचा निवडणूक लढण्याची आग्रह असल्याचे माघार नाही, असे भाजप नेत्यांनी बुधवारी रात्री सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पटोले आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील सागर या निवास्थानी फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा राज्यभसा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने या तिघा नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra Fadanvis
'ते' गृहमंत्री ED ला वेडे समजले, राज ठाकरेंचा अनिल देशमुखांना टोला

पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात राजकीय संघर्ष होत असला तरी, नेमक्या कोणत्या काळात विरोधकांना कशी मदत करायची असते, याचे काही अलिखित संकेत आहेत. ते पाळले जावेत, याचसाठी फडणवीस यांची भेट घेतली. ही निवडणूक होऊ नये, अशी मागणी आहे. त्यावर तुर्तास तरी विचार करून निर्णय घेण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत असेल. यापुढच्या काळात भाजपला अशाच स्वरुपाच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल."

राज्यसभा पोटनिवडणुकीवरूनही महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमधील संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेस नेत्यांनी फोनवरून चर्चा करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्रसंगी भाजप नेत्यांची भेट घेऊ, असेही सांगितले होते. यानुषंगाने पटोले, थोरात, फडणवीस यांच्या भेटीकडे लक्ष लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com