काँग्रेस आमदारांकडून साध्वी प्रज्ञासिंह यांना जिवंत जाळण्याची धमकी ! (व्हिडिओ)

वृ्त्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

नथुराम गोडसे यांना देशभक्त संबोधणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत असतानाच, त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील ब्यावरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी ही धमकी दिली आहे.

भोपाळ : नथुराम गोडसे यांना देशभक्त संबोधणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत असतानाच, त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील ब्यावरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी ही धमकी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

गोवर्धन दांगी म्हणाले, साध्वी प्रज्ञासिंह या कधी मध्यप्रदेशमध्ये आल्यातर त्यांचा पुतळाच नाहीतर त्यांना देखील जिवंत जाळू'. एसपीजी सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान डीएमके खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचे उदाहरण दिले होते. विशेष सुरक्षेअभावी गोडसे याने कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली हे राजा यांनी सभागृहात सांगितले होते. परंतु, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ झाला होता. तसेच, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेधही केला होता.

खंडणीप्रकरणी 'या' अभिनेत्रीचा फेटाळला अटकपूर्व जामीन

त्यानंतर त्यांनी केलेल्या या वक्तव्याविषयी सभागृहात माफीही मागितली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले की, मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते. तसेच त्यांच्या योगदानाचाही सन्मान करते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर थरारक अपघात; चौघे जागीच ठार

दरम्यान, विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर भाजपने कारवाई केली. वादग्रस्त विधानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Govardhan Dangi reacts on BJP MP Pragya S Thakur