खासदार राजीव सातव यांचं निधन

खासदार राजीव सातव यांचं निधन

Congress MP Rajiv Satav : काँग्रेस खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Jehangir hospital Pune ) राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी ट्विट करत राजीव सातव यांचं निधन झाल्याची माहिती दिली. राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केलं. “निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं, आणि आजपर्यंत माझ्यासोबत चालत होते…. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा.”

काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो cytomegalovirus हा नवा व्हायरस सापडला होता. मागील 23 दिवसांपासून राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. 23 एप्रिलपासून पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर होते.

खासदार राजीव सातव यांचं निधन
शरद पवारांसह उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ, राजीव सातव यांची मराठीतून शपथ

कोण होते राजीव सातव?

46 वर्षीय राजीव सातव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मध्ये हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com