
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने काँग्रेसने षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखविण्याचा प्रयत्न केला. भगवा दहशतवाद खोटा होता हे न्यायालयात पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. याप्रकरणी आलेल्या निकालाचा पूर्ण अभ्यास करूनच त्याबद्दल पुढील पाऊल काय उचलायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.