Vidhan Sabha 2019 : मुंबईसह कोकणात आघाडीसमोर युतीचे तगडे आव्हान

Vidhan Sabha 2019 : मुंबईसह कोकणात आघाडीसमोर युतीचे तगडे आव्हान

मुंबई : मुंबई, ठाणेसह कोकणातील सुमारे 75 जागांवर भाजप-शिवसेना युतीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समोर तगडे आव्हान आहे. गेल्यावेळी 75 पैकी कॉंग्रेस-राष्टवादीने केवळ 14 जागा जिंकल्या होत्या. मागील वेळेच्या जागा राखण्यासाठी आघाडीला यंदा घाम गाळावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस हे चार पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे गेल्यावेळी चौरंगी लढती झाल्या होत्या. यामध्ये भाजप व शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचाव धुव्वा उडवला होता.यावेळी युती आणि आघाडी असा सामना आहे. मुंबईत एकूण 36 जागा आहेत. या पैकी भाजपने गेल्यावेळी 15 तर शिवसेनेने 14 जागा जिंकल्या होत्या. तर कॉंग्रेसने कशाबशा पाच जागा राखल्या होत्या. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला भोपळा फोडता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीचा विचार करता वडाळयात कालिदास कोळंबकर भाजपकडून लढत आहेत. मालाडचे अस्लम शेख हे तळयात मळयात करीत असताना अखेर कॉंग्रेसकडून उभे राहिले आहेत.

ठाणे जिल्हयात एकूण 24 जागा आहेत. यापैकी भाजपने मुसंडी मारत 8 जागा, शिवसेनेने 7 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या. तर बहुजन विकास आघाडीने तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला ठाणे जिल्हयात मोठे भगदाड पडले आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेच्या तिकीटावर लढत आहेत. तर ऐरोलीत संदीप नाईक यांच्या जागी वडिल गणेश नाईक हे भाजपकडून उभे आहेत. तर उल्हासनगरमध्ये ज्योती कलानी अखेरीस राष्ट्रवादीवादीकडून उभ्या राहिल्या आहेत.तर ठाणे जिल्हयात कॉंग्रेस हददपार झाली आहे.

मुंबई, ठाणे जिल्हयाप्रमाणेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयांत आघाडीसमोर युतीचे आव्हान तगडे आहे. कोकणात कर्जत, श्रीवर्धन, दापोली, गुहागर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार गेल्यावेळी निवडूण आले होते. रायगडमध्ये अलिबाग, पेण येथे शेकापचे आमदार होते.तर कोकणात कणकवलीत कॉंग्रेसचा ऐकमेव आमदार होता.यंदा गुहागरचे भास्कर जाधव यांनी शिवसेनेत तर कणकवलीचे नितेशा राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासर्व राजकीय घडामोडीचा विचार करता आघाडीला युतीचे तगड आव्हान आहे.
चौकट

2014 ची स्थिती
-मुंबईत- विधानसभा 36- कॉंग्रेसचे आमदा- मालाड- अस्लम शेख, चांदीवली- नसीम खान, धारावी- वर्षा गायकवाड, मुंबादेवी- अमिन पटेल, वडाळा- कालिदास कोळंबकर- सध्या भाजप
-ठाणे- विधानसभा 24- राष्ट्रवादीचे आमदार- शहापूर- पांडुरंग बरोरा-सध्या-शिवसेना, उल्हासनगर- ज्योती कलानी, मुंब्रा-कळवा- जितेंद्र आव्हाड, ऐरोली-संदीप नाईक-सध्या भाजप
- कोकण- विधानसभा 15- राष्ट्रवादीचे आमदार कर्जत- सुरेश लाड, श्रीवर्धन- अवधूत तटकरे-सध्या शिवसेना, दापोली- संजय कदम सध्या शिवसेना, गुहागर-भास्कर जाधव सध्या शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com